रामदेवबाबांच्या पतंजलीचा महाराष्ट्रात डेअरी प्रकल्प

ramde
योगगुरू रामदेवबाबांचा पतंजली उद्योग डेअरी क्षेत्रात ही झेप घेत असून या प्रकल्पातून दूध, दही, पनीर, लोणी व लस्सी या सारखी डेअरी उत्पादने बाजारात आणली जात आहेत. या आर्थिक वर्षात त्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकात डेअरी प्लाँट सुरू केले जातील असे रामदेवबाबांनी कर्नाल येथे भरलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय डेअरी अनुसंधानच्या परिषदेत सांगितले.

डेअरीतील स्वदेशी ब्राँड अमूलचे कौतुक यावेळी रामदेवबाबा यांनी केले व डेअरी अनुसंधानच्या सहकार्याने काम करण्याची इच्छाही यावेळी व्यक्त केली. रामदेवबाबांनी डेअरीबरोबरच स्वदेशी गाईंच्या पोषणासाठीही खास व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले भारतात सध्या डेअरी व्यवसायाची उलाढाल ३ लाख कोटींची आहे ती २०२२ पर्यंत पाच लाख कोटींवर जाईल. पतंजलीच्या प्रकल्पांमुळे किमान १ हजार जणांना रोजगार मिळेल तसेच कोट्यावधी शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ होईल. देशी गाईंच्या दुधाची गुणवत्ता व दूध देण्याची क्षमता वाढविण्यासाठी अमेरिका व ब्राझील देशातील तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment