मारूतीची धोनी इन्स्पायर्ड आल्टो सादर

dhoni
देशातील सर्वात बड्या मारूती सुझुकी कंपनीने भारताच्या वन डे क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्यासाठी इन्स्पायर्ड धोनी अल्टो स्पेशल एडिशन कार शनिवारी लाँच केली. या कार्यक्रमाला धोनी, धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील कलाकार व कंपनीचे भारतातील मार्केट व विक्री प्रमुख आर.एस.कलसी उपस्थित होते. या कारच्या निमित्ताने मारूती सुझुकी धोनीच्या जीवनावर आधारित वरील चित्रपटाशी जोडली गेली आहे.

आल्टो ८०० व आल्टो के १० साठीही स्पेशल एडिशन लाँच केली गेली आहे. ही कार डिलर्सकडे आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकणार आहे. या कार्यक्रमात बोलताना कलसी म्हणाले, आल्टो ही आमची एक अशी कार आहे, ज्याची ३० लाखांहून अधिक युनिट विकली गेली आहेत. क्रिकेटमध्ये धोनीला मिळालेले यश आणि आमच्या या मॉडेलने विक्रीत मिळविलेले यश व ओळख या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्टार बनविण्यास कारणीभूत ठरले आहे.

Leave a Comment