ऑर्डर ए डॅडी अॅपने महिलांना स्पर्म निवडीची संधी

sperm
ब्रिटनच्या स्पर्म बँकेतील भारतीय वंशाचे डॉक्टर डॉ.कमल आहुजा यांनी असे एक अॅप विकसित केले आहे, ज्यामुळे अपत्य प्राप्तीसाठी उपचार घेत असलेल्या महिलांना आपल्या बाळाचे वडील होण्यास योग्य वाटतील त्या व्यक्तीचे स्पर्म मिळविणे शक्य होणार आहे. या महिला स्पर्म डोनरची निवड ऑनलाईन करू शकणार आहेत. जगातील या प्रकारचे पहिलेच अॅप असल्याचा दावा आहुजा यांनी केला आहे. या अॅपचे नांव ऑर्डर अ डॅडी असे केले गेले आहे.

या अॅपमुळे अपत्यप्राप्तीसाठी इच्छुक असलेल्या महिला घरच्या घरी बसून स्पर्म डोनेशन करणार्‍या व्यक्तीची माहिती मिळवू शकतील व विचार करून त्यातील कुठले स्पर्म घ्यायचे याची निवड करू शकतील. त्यामुळे दान कर्त्याचे केस, डोळे, उंची, शैक्षणिक स्तर, व्यवसाय, व्यक्तिमत्त्व यांतून महिलांना आपल्या बाळाचे वडील कसे असावेत याची निवड करता येईल. अर्थात त्यासाठी स्पर्म बँकेकडे ९५० पौंड भरल्यानंतर या महिला ज्या प्रजनन केंद्रात उपचार घेत असतील त्या केंद्राकडे निवडलेले स्पर्म पोहोचविले जाणार आहेत. ब्रिटनमधील ५० टक्के आयव्हीएफ क्लिनिकनी या सेवेसाठी नोंदणी केली असल्याचे व त्याला कायदेशीर मान्यता असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment