पहिली ट्रान्सफॉर्मर कार सादर

robocar
जगातील पहिली ट्रान्सफॉर्मर कार तुर्कस्तानातील १२ इंजिनिअर्स व चार तंत्रज्ञांनी सादर केली आहे. ही बीएमडब्ल्यू कार कांही सेकंदात रोबो मध्ये परावर्तित होऊ शकते. ही कार रिमोटवर चालते आणि ती तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला आहे.

ही कार रोबोमध्ये बदलली गेली की रोबोचे डोके व हात हलू शकतात मात्र ही कार चालू शकत नाही अथवा रोबोप्रमाणे उडूही शकत नाही. या क्रिया करण्यासाठी एक विशेष फंक्शन या कारला जोडले जाणार आहे. कारसंदर्भातले सर्व संशोधन पूर्ण झाले असून ती लवकरच बाजारात आणली जाणार आहे. लॅटरॉन कंपनीने तयार केलेली ही ट्रान्सफॉर्मर कार ट्रान्सफॉर्मर चित्रपटातील अॅनिमेटेड रोबोप्रमाणेच आहे.

ही कार रिमोटवर चालविता यावी म्हणून तिला इलेक्ट्रीक इंजिन दिले गेले आहे. जेव्हा या कारचा रोबो बनतो, तेव्हा तिचे दरवाजे उघडले जातात व ब्लेड सारखे हात बाहेर येतात. कारच्या छतातून रोबोचे डोके बाहेर येते. अवघ्या ५० सेकंदात या कारचे रोबोत रूपांतर करता येते.

Leave a Comment