झिरो स्टार हॉटेलातील अजब खोली

zerostar
जगभरात अनेक प्रकारची हॉटेल्स आहेत. प्रत्येकाची तर्‍हाही वेगवेगळी आहे. कांही पाण्यात आहेत, कांही उंच पहाडांवर आहेत तर कांही झाडांवरही आहेत. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांत सहा हजार फुटांवरही असेच एक हॉटेल आहे व त्याचे नांव आहे झिरो स्टार. या हॉटेलसारखे हॉटेल जगात दुसरीकडे कुठेच पहायला मिळणार नाही असा दावा हॉटेल चालकांनी केला आहे व तो खराही असावा.

समुद्रसपाटीपासून साधारण ६४६३ फूट उंचावर पहाडात असलेल्या या हॉटेलमध्ये एकच रूम आहे. या रूमला ना दारे आहेत, ना खिडक्या, ना भिंती ना छत. इतकेच काय या ठिकाणी वॉश रूमही नाही. म्हणजे खुल्या आकाशाखाली असलेल्या या रूममध्ये फक्त एक बेड आहे. अर्थात या हॉटेलच्या बुकींगसाठीही प्रतीक्षा करावी लागते. या ओपन एअर रूमचे भाडे आहे एका रात्रीसाठी १४ हजार रूपये.शिवाय वॉशरूमचा वापर करायची वेळ आली तर १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वॉशरूमचा सहारा घ्यावा लागतो.

दुसरे म्हणजे बुकींग करूनही तुम्ही येथे हमखास जाल याची खात्री नाही. कारण हवा बिघडलेली असेल तर बुकींग रद्द केले जाते. आर्टिस्ट फ्रँक व पॅट्रीक रिक्लीन व हॉस्पिटॅलिटी प्रोफेसर डॅनियल चार्बोनायर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली असून स्वित्झर्लंडच्या लँडस्केपचे दर्शन घडावे असा त्यामागे उद्देश आहे.

Leave a Comment