अलिबाबा करणार ई कॉमर्स उपग्रह लाँच

alibaba
ऑनलाईन मार्केटिंगमधील दिग्गज चीनी कंपनी अलिबाबा पुढच्या वर्षात जगातला पहिला ई कॉमर्स उपग्रह लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी चायना अॅकॅडमी ऑफ व्हेईकल टेक्नॉलॉजी व चायना स्पेस म्युझियमशी सहकार्य करार केला असल्याचे समजते. या उपग्रहामुळे कंपनी त्यांच्या ग्राहकांना जगातील सर्वोत्तम भाजीपाला व उच्च गुणवत्तेची उत्पादने सॅटेलाईटच्या मदतीने पुरवू शकणार आहे.

या उपग्रहामुळे कृषी उत्पादने व चांगल्या भाज्या सर्वसामान्य ग्राहकांनाही मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहेत. कंपनीने त्यासाठी कस्टमाईज उत्पादनांची मालिका तयार करण्याची योजनाही आखली आहे. स्पेस तंत्रज्ञान व ई कॉमर्स डेटा यांच्या संयोगातून वरील तिन्ही कंपन्या अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठे काम करू शकणार आहेत.

Leave a Comment