संगीतवेड्या फॅनची इच्छा हृतिकने केली पूर्ण

hritik
संगीतकार आजोबा रेाशन यांच्या संगीताचा वारसा रक्तातच असलेल्या बॉलीवूड अभिनेत्याला संगीताविषयी प्रेम असणे तसे नवलाचे नाही. मात्र संगीतवेड्या फॅन्ससाठीही हृतिक कांहीही करायला तयार असतो याचा अनुभव नुकताच आला.

हृतिकच्या काबील या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिकने कोलकाता येथील २१ वर्षीय सिंगर कुशल पॉल याची इच्छा अशीच पूर्ण केली. कुशलने सारेगामा ट्राॅफी जिंकली आहे व हृतिकला भेटून त्याच्यासमोर आपली कला सादर करणे हे त्याचे स्वप्न होते. हृतिकला हे समजताच त्याने मुद्दाम वेळ काढून आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कुशलला बोलावले. त्याच्याशी गप्पा मारल्या, फोटो काढले. यावेळी कुशलनेही हृतिकच्या बँगबँग चित्रपटातील गाणी त्याच्यासमोर गाऊन स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.