फ्रिडम २५१ स्मार्टफोन आणि सनी लियोनीसह काढा सेल्फी

freedom
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रिडम २५१ तयार करणार्‍या रिंगिग बेल कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी लॉयल्टी कार्ड प्रोग्रॅम सादर केला असून त्यात त्यांच्या ग्राहकांना हॉट अभिनेत्री सनी लियोनीसह सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे. या प्रोग्रॅमचे प्रमोशन सनी लियोनी करणार आहे. हे कार्यक्रम ८ नोव्हेंबरला डेडराडून व मेरठ येथे तर ९ नोव्हेंबरला कानपूर व आग्रा येथे होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रिंगिग बेल त्यांच्या ग्राहकांना लॉयल्टी कार्ड विकून लॉयल्टी मेंबर बनविणार आहे. त्यात या सेल्फी प्रोग्रॅमचा समावेश आहे. त्या अंतर्गत ग्राहक ५००, १००० व २००० रूपयांचे लॉयल्टी कार्ड खरेदी करू शकतील. ही कार्डे कंपनीच्या वेबसाईटवरही खरेदी करता येतील. या कार्डधारकांना कंपनीच्या अनेक प्रॉडक्टवर ५ ते १५ टक्के सूट दिली जाणार आहे. १ किवा २ हजाराचे कार्ड घेणार्‍यांना २५१ रूपये किमतीचे दोन फ्रिडम फोन मोफत दिले जाणार आहेत आणि १० भाग्यवंत ग्राहकांना सनीच्या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या वेळी सनीसोबत सेल्फी काढण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

Leave a Comment