नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपचे अकाऊंट डिलीट करणाऱ्या सर्व ग्राहकांची माहिती तसेच त्यांचा डेटा लगेचच काढून टाकण्यात यावा आणि आपल्या युजर्सची माहिती व्हॉट्सअॅपने फेसबुकसोबत शेअर करू नये, असे आदेश दिले असून याशिवाय नियामक आराखड्यात व्हॉट्सअॅपसारख्या मेसेजिंग अॅपला आणणे शक्य आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्र सरकार आणि ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑ इंडिया) यांच्याकडे केली आहे. व्हॉट्सअॅप युजर्सची सर्व माहिती आणि डेटा त्याने अकाऊंट डिलीट करताच काढून टाकतो, असे स्पष्ट केल्याबद्दल न्यायालयाने समाधान व्यक्त केले.