पॉवरफुल अमेरिकन अध्यक्षांनी या गोष्टींची नाही पॉवर

ban
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजे जगातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती असे मानले जाते. मात्र या पॉवरफुल माणसावरही कांही गोष्टी करण्यावर बंदी आहे म्हणजे त्यांना कांही ठराविक गोष्टी करण्याची पॉवरच नाही हे समजले तर नवल वाटेल. कोणत्या आहेत या गोष्टी?
अमेरिकन अध्यक्षांना आयफोनचा वापर करण्यावर बंदी आहे. म्हणजे जगातील कोणीही आयफोन वापरू शकतो पण अमेरिकन अध्यक्ष नाही. खरे तर रेकॉडिगची सुविधा असलेला कोणताच फोन अमेरिकन अध्यक्ष वापरू शकत नाहीत. त्यामुळेच ओबामा ब्लॅकबेरीचा फोन वापरतात.

अमेरिकन अध्यक्षांना कार ड्राईव्ह करण्यास मनाई आहे. ते फक्त गोल्फ क्लबवर ड्राईव्ह करू शकतात. अन्य वेळी त्यांना कारच्या मागच्या सीटवरच बसावे लागते. सिक्रेट सर्व्हिसमुळे त्यांना कार ड्राईव्ह करण्याची परवानगी नाही. तसेच अमेरिकेने २०१५ साली गे मॅरेजला कायदेशीर परवानगी दिली आहे. अमेरिकन अध्यक्ष आता त्यावर बॅन आणू शकत नाहीत अथवा गे मॅरेज बेकायदाही ठरवू शकत नाहीत.

अमेरिकेत गांजा ओढणे व गांजाचा अन्य वापर यावर बंदी आहे. कांही देशात औषधांत गांजा वापरला जातो अशा औषधांवरही अमेरिकेत बंदी आहे. ही बंदी उठवून गांजाचा वापर लिगल करण्याची पॉवर अमेरिकन अध्यक्षांना नाही. तसेच अमेरिकेत वॉरची म्हणजे युद्धाची घोषणा करण्याचा अधिकार फक्त काँग्रेसला आहे त्यात अध्यक्षांचा कांहीही रोल नसतो.

अमेरिकन अध्यक्ष अॅबॉर्शन अथवा इच्छामरण मामल्यात डिसिजन देऊ शकत नाहीत. तसेच राज्यात आणीबाणी लागू झाली तरी नागरिकांकडे असलेली शस्त्रे जप्त करण्याचे आदेशही अध्यक्ष देऊ शकत नाहीत. जोपर्यंत एखादे लिगल कारण नाही तो पर्यंत या मामल्यात अध्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाहीत.

अध्यक्षपदावर असेपर्यंत त्यांना अन्य कोणत्याही मार्गाने पैसे मिळविता येत नाहीत. पगार हाच त्यांचा सोर्स ऑफ इन्कम असू शकतो. तसेच घटनेतील कोणतेही बदल करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने जे निर्णय घेतलेले असतील त्यात अध्यक्षांची कांहीही भूमिका असू शकत नाही.

Leave a Comment