एअरटेलची ९० दिवसांसाठी फ्री डेटा प्लॅनची ऑफर दिली आहे

airtel
नवी दिल्ली – रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने नवा प्लॅन आखला असून आपल्या ४जी यूजर्ससाठी एअरटेलने ९० दिवसांसाठी फ्री डेटा प्लॅनची ऑफर दिली आहे. यासाठी एअरटेल यूझर्सला १,४९५ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे आणि त्यानंतर ९० दिवसांसाठी फ्री डेटा उपलब्ध होणार आहे.

९० दिवसांचा फ्री डेटा प्लॅन एअरटेलच्या जुन्या ग्राहकांना हवा असेल तर त्यासाठी १,४९५ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. तर, नव्या ग्राहकांना हा प्लॅन घ्यायचा असेल १,४९४ रुपयांचे पहिले रिचार्ज उपलब्ध होईल.

भारती एअरटेलचे संचालक अजय पुरी यांनी म्हटले की, खास अशा युजर्ससाठी हा प्लॅन आहे, जे ४जी हँडसेट वापरतात आणि ज्यांचा इंटरनेट डेटा अधिक खर्च होतो. या रिचार्जमुळे ग्राहकांना इंटरनेट डेटा संपण्याची काळजी करण्याची गरज पडणार नाही म्हणजेच सतत इंटरनेट डेटा रिचार्ज करावे लागणार नाही. एअरटेल कंपनीने सांगितले की, हा प्लॅन सध्या दिल्लीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे आणि येत्या काळात इतरही शहरातील नागरिकांसाठी ही ऑफर लाँच करण्यात येणार आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी फ्री सिमकार्डसह ९० दिवसांचा डेटा आणि व्हॉइस कॉलिंग फ्रीची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. जिओने दिलेल्या या ऑफरनंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर बाजारात उपलब्ध करुन देत आहेत.

Leave a Comment