ई-कॉमर्स कंपन्यांचा १ ऑक्टोबरपासून महासेल

e-commerce
नवी दिल्ली – ऑनलाइन शॉपिंग करणा-यांची १ ऑक्टोबरपासून चांदी होणार हे निश्चित आहे. कारण सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या स्नॅपडील आणि फ्लिपकार्टनंतर आता अॅमॅझोनने देखील महासेलची घोषणा केली आहे. १ ते ५ ऑक्टोबरपर्यंत अॅमॅझोनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल चालेल. २ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सुरू करत आहे, तर त्याच दिवसापासून स्नॅपडील अनबॉक्स दिवाली सेल सुरू करणार आहे. दोन्ही कंपन्यांचा महासेल ६ ऑक्टोबरपर्यंत चालेल.

या दरम्यान मोबाइल फोन आणि टीव्ही समवेत होम अप्लायंसेस, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, होम फर्निशिंग, फर्निचर आणि एफएमसीजी उत्पादनांवर ई-कॉमर्स कंपन्याचा भर असेल. ही भारतातील सर्वात मोठी सेल ऑफर असेल, यादरम्यान ग्राहकांना चांगले अनुभव यावेत असा आमचा प्रयत्न असेल असे अॅमॅझोन इंडियाचे उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी सांगितले.

२ ते ६ ऑक्टोबरपर्यंत स्नॅपडीलने अनबॉक्स दिवाळी सेलची घोषणा केली आहे. यादरम्यान ग्राहकांना विशेष प्रकारात मोठी सूट मिळू शकते. या वस्तूंमध्ये होम अप्लायंसेस, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाइल, होम फर्निशिंग, फर्निचर आणि एफएमसीजी उत्पादनांवर सूट मिळेल. या वर्गवारीत खरेदी करणा-यांना ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

२ ते ६ ऑक्टोबरपर्यंत फ्लिपकार्ट देखील बिग बिलियन डे अंतर्गत महासेल सुरू करत आहे. यादरम्यान विशेष प्रकारातील उत्पादनांसाठी ग्राहक मोठी सूट मिळवू शकणार आहेत.

Leave a Comment