याहूची ५० कोटी अकाऊंट हॅक

yahoo
नवी दिल्ली – सर्वात मोठा सायबर हल्ला प्रसिद्ध इंटरनेट कंपनी याहूवर झाला असून याहूच्या जवळपास ५० कोटी यूजर्सचे अकाऊंट हॅकर्सनी हॅक केले आहे. याहूने या बाबतची माहिती गुरुवारी रात्री ट्विटरवर दिली.

हॅक केलेल्या डाटामध्ये यूजर्सच्या नावा व्यतिरिक्त ईमेल अॅड्रेस, फोन नंबर, जन्मतारीख आणि हॅश पासवर्डसह बरीच माहिती आहे. तसेच, याहूने हे पण सांगितले की हॅकर्सनी अनप्रोटेक्टेड पासवर्ड्स, पेमेंट कार्ड डाटा, बँक अकाऊंट संबंधित माहिती चोरली नाही.

याहूला जुलैमध्ये अमेरिकेच्या टेलीकॉम क्षेत्रातील वेरिजॉन कंपनीने ४८० कोटी डॉलरला विकत घेण्याचा करार केला होता. सायबर एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की या हॅकिंगचा परिणाम, या करारावर होण्याची शक्यता आहे. परंतु, आतापर्यंत हॅकिंगचा परिणाम याहूच्या विक्री कींवा त्याच्या मूल्यांकनावर होईल की नाही याबाबत ठोस माहिती मिळली नाही.

Leave a Comment