नोटेची फोटोकॉपी काढून पाहिलीत?

notes
अनेक कागदपत्रे, फोटो, अन्य काही मजकूर याच्या फोटोकॉपी काढल्या जातात. अगदी घरात प्रिंटर असेल तर घरच्याघरीही हे काम होऊ शकते. आपण कधी चलनी नोटेची फोटोकॉपी काढून पाहिली अ्राहे काय? नसेल तर काढूही नका कारण कोणत्याही चलनी नोटेची फोटोकॉपी निघत नाही. तुम्ही रंगीत फोटोकॉपी काढण्याचा प्रयत्न केलात तर प्रिंटरच तुम्हाला त्यासाठी मनाई करतो. कोणताही मॉडर्न प्रिंटर अथवा स्कॅनर डिव्हाईस चलनी नोटांची फोटोकॉपी करत नाही.

यामागे कारण आहे. ते म्हणजे तुम्ही चलनी नोट संबंधित उपकरणात घातलीत की त्वरीत ते उपकरण नोट ओळखते व प्रिटींगसाठी मनाई करते. जबरदस्तीने तुम्ही फोटोकॉपी काढायचा प्रयत्न केला तर मशीन साथ देत नाही व बरेचदा प्रिंटर शट डाऊन होतो. अर्थात अशी चलनी नोटांची फोटोकॉपी करणे हे बेकायदेशीर आहेच. पण या बेकायदेशीर कामात प्रिंटर अथवा स्कॅनिंग डिव्हाईही तुमची साथ देत नाहीत.

हे असे का होते? त्याचे उत्तर असे- कोणत्याही देशाच्या करन्सीवर संबंधित सरकार कांही चिन्हे देत असते. त्याला युरियन कॉन्स्टेलेशन असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा अजब पॅटर्न अ्सतो. उदाहरण म्हणजे आपल्या १०० रूपयांच्या नोटेवर म.गांधीच्या मस्तकावर कांही गोल डॉट दिसतात. तुम्ही जेव्हा ही नोट फोटोकॉपी काढण्यासाठी प्रिंटरमध्ये घालता, तेव्हा हे डॉट प्रिंटरकडून ओळखले जातात व या कागदाचे प्रिंटींग केले जात नाही. फोटोशॉपमध्ये जाऊन तुम्ही या खुणा काढायचा प्रयत्न केला तर एडिट करताच फोटोशॉपचे सॉफ्टवेअर येथे करन्सीशी कांही तरी छेडछाड सुरू असल्याचे ओळखते व एरर दिली जाते.

Leave a Comment