लावाने लाँच केला एक्स २८ स्मार्टफोन

lava
नवी दिल्ली : आपला एक्स सिरीजचा ४जी स्मार्टफोन एक्स २८ भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने लाँच केला असून ७३४९ रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. ग्राहकांसाठी लावा एक्स २८ गोल्ड, सिल्व्हर आणि कॉफी कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले, १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोरचा प्रोसेसर, ६.० मार्शमेलो अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम, १ जीबी रॅम, ८ जीबीची इंटरनल स्टोरेज क्षमता, जी ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात ८ मेगापिक्सलचा एलईडी फ्लॅशसह रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, मायक्रो युएसबी २.० पोर्ट, ट्रान्सलेशनसाठी विशेष फिचर्स देण्यात आले आहे.

Leave a Comment