दिवाळीपूर्वीच मायक्रोमॅक्सचा दिवाळी धमाका

micromax
मुंबई – आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या आधीच स्मार्टफोन जगतातील नामांकीत कंपनी मायक्रोमॅक्सने खुशखबर दिली असून चार ४ जी स्मार्टफोन दिवाळीआधीच मायक्रोमॅक्सचे लाँच होणार आहेत.

कंपनीच्या नव्या चारही स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ कॉलींग अॅप ‘डिओ’ला प्री-लोड करण्यासाठी गूगलसोबत करार केला असल्याचे मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक विकास जैन यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, व्हिडीओ कॉलिंगला केवळ शहरीभागापुरते मर्यादित असलेले फीचर म्हटले जात असले तरी, मायक्रोमॅक्स या फीचरला आमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून देशभरातील सर्व बाजारपेठेत पोहचवेल. मायक्रोमॅक्स स्मार्टफोन जगतात नावाजलेली कंपनी आहे. आतापर्यंत या कंलनीने चांगले फीचर्स असलेले विविध फोन बाजारात आणले. सध्या स्मार्टफोनमध्ये मायक्रोमॅक्सचे युजर्स जास्त आहे. त्यामुळे दिवाळीआधी मायक्रोमॅक्स कोणते चार स्मार्टफोन बाजारात आणते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment