जग्वारची नवी सेडान कार एक्सएफ लाँच

jaguar
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी सेडान कार एक्सएफ जगातील प्रसिद्ध लक्झरी कार निर्मिता कंपनी जग्वारने लाँच केली असून ४९ लाख ५० हजार रुपयात ही नवी सेडान कार ग्राहकांना मिळणार आहे. या कारच्या डिलेव्हरीसाठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरुवात करण्यात येणार आहे.

पेट्रोल वेरियंटमधील या कारमध्ये २.० लिटरचे ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आल्यामुळे २३७ बीएचपीचा पॉवर आणि ३४० एनएमचा टार्क निर्माण करु शकतो. तसेच या डिझेल वेरियंटमधील कारमध्ये २.० चे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १७७ बीएचपीचा पॉवर आणि ४३० एनएमचा टार्क जनरेट करु शकतो. या नव्या जग्वार एक्सएफ सेडान कारमध्ये ऍडक्टिव्ह एलईडी हेडलाइट आणि नवा फ्रंट बंपर देण्यात आला आहे. कारच्या मागील बाजूस एफ टाइप टेललॅम्प देण्यात आला आहे. यासोबतच या कारमध्ये कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले असून, स्मार्टफोनमधील ऍपच्या माध्यमातून कारचे इंजिन आणि एसी स्टार्ट करता येऊ शकतो.

Leave a Comment