खरीपाचे यंदा बंपर पीक, उस उत्पादन रोडावणार

kharif
यंदा देशभरातच मान्सूनची हजेरी समाधानकारक राहिल्याने खरीपाची विक्रमी पेरणी झाली व त्यामुळे यंदा खरीप धान्यांचे बंपर पीक अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदाच्या वर्षात खाद्यान्य उत्पादन १३५०.३ लाख टनांवर जाईल असा अंदाज असून गेल्या पाच वर्षाच्या सरासरीत हे उत्पादन खूपच अधिक आहे. गेल्या पाच वर्षांची खरीप पिकांची सरासरी १२७३.८ लाख टन आहे.

यंदा तांदूळाच्या उत्पादनात ११ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे तर डाळींचे उत्पादन २५ लाख टनांनी वाढेल असा अंदाज दिला जात आहे. तेलबिया व गळीत धान्यांचे उत्पादनातही लक्षणीय वाढ अपेक्षित असन ते २३३०६ लाख टनांवर होईल असे सांगितले जात आहे. उस उत्पादन मात्र ४.६ कोटी टनांनी घटेल असे दिसून आले आहे. कापसाचे उत्पादनही थोडे वाढणार आहे. उस व कापूस ही कॅश क्रॉप म्हणून ओळखली जातात.