नवी दिल्ली – मोटो ई ३ पॉवर हा नवीन स्मार्टफोन नुकताच जगातील अग्रगण्य स्मार्टफोन निर्मिती कंपनी मोटोरोला कंपनीने लाँच केला आहे. या स्मार्टफोनला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार एकाच दिवसात मोटो ई ३ पॉवरच्या तब्बल एक लाख हँडसेटची विक्री झाली आहे.
एका दिवसात मोटो ई ३ पॉवरच्या एक लाख हँडसेट्सची विक्री
आपल्या ट्वीटमध्ये मोटोरोला इंडियाचे जनरल मॅनेजर अमित बोनी यांनी म्हटले आहे की, स्मार्टफोन विक्रीचा हा एक नवा विक्रम फ्लिपकार्ट आणि मोटो इंडियाने मिळून नोंदवला आहे. एक लाख मोटो ई३ पॉवरच्या यूनिट्सची केवळ एका दिवसात १ लाख हँडसेट्सची विक्री झाली आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनवर जिओ वेलकम ऑफरही आहे. हा स्मार्टफोन एक्स्क्लुझिव्हली फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.