आता ऑनलाईन काढता येणार पीएफचे पैसे !

epfo
नवी दिल्ली: नोकरी सोडल्यानंतर अनेकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी कंपनीत अनेक चकरा माराव्या लागतात. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा. मात्र आता तुमचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आता जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.

पीएफचे पैसे मिळवण्यासाठी आता तुम्हाला कंपनीत चकरा मारण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही आरामात घरबसल्या तुमचे पीएफचे पैसे काढू शकता. येत्या डिसेंबर महिन्यापासून खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ईपीएफओ याच्या डेटा इंटिग्रेशनवर काम करीत आहेत.

कर्मचा-यांचे पीएफचे पैसे ऑनलाईन मिळावे यासंदर्भातील डेटा इंटिग्रेशनला ईपीएफओ अंतिम रूप देत आहे. यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केले गेले असून या सॉफ्टवेअरच्या मदतीने कर्मचारी त्यांचे पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकतील. सध्या ईपीएफओच्या अ‍ॅक्टीव्ह अकाऊंट होल्डर्सची संख्याही ३.६ कोटी इतकी आहे. अशात ही नवी सुविधा सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे.

दरम्यान, सध्या कर्मचा-याला नोकरी सोडल्यानंतर पीएफचे पैसे मिळवण्यासाठी कागदपत्रे घेऊन चक्कर मारावे लागतात. तुम्हाला फॉर्म-१०C आणि फॉर्म १९ द्यावा लागतो. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या यूएएन नंबरच्या माहितीसोबत अर्ज सादर करावे लागतात. त्यानंतर १५ ते ३० दिवसांनंतर तुमचे पीएफचे पैसे तुमच्या अकाऊंटला जमा होतात.

2 thoughts on “आता ऑनलाईन काढता येणार पीएफचे पैसे !”

Leave a Comment