व्हॉट्सअॅप टक्कर देणार गुगलचे नवे अॅप

google
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी गुगलने स्वतःचे इंन्स्टंट मॅसेजिंग अॅप अॅलो (Allo) लाँच केले असून आजपासून अॅन्ड्रॉइड आणि iOS वापरणाऱ्यांसाठी हे अॅप उपलब्ध झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळी माहिती अॅलो अॅपबद्दल समोर येत होती. अखेर गुगलने याचा एक व्हिडिओ शेअर करत हे अॅप लाँच केले आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणेच या अॅपमध्ये आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत.

एचडी व्हिडिओ क्वालिटी, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअर आणि चॅटिंगसह व्हॉट्सअॅपप्रमाणेच फीचर्स या अॅपमध्ये देण्यात आले आहेत. गूगलने व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी स्वतःचे इंन्स्टट मेसेजिंग अॅप अॅलो लॉन्च केले आहे. प्ले-स्टोअरवर आणि अॅपलच्या अॅप स्टोरवरून हे अॅलो अॅप डाऊनलोड करता येऊ शकते. गूगल आपल्या सर्च इंजिनचा वापर करून इतर मेसेंजरपेक्षा याला स्मार्ट बनवण्यासाठी कामाला लागले आहे.

या अॅलो अॅपवरुन त्वरीत रिप्लाय करणे शक्य आहे. रिप्लाय करताना तुम्हाला अनेक सजेशन मिळतील त्याला टॅप करून उत्तर देता येईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे समोरच्याने तुम्हाला काय पाठवले आहे हे समजेल. गूगल असिस्टंटवर क्लिक केल्यास एक कन्वर्सेशन ओपन होईल. याद्वारे थेट गूगल चॅट बॉटसोबत चर्चा करू शकता. येथे तुम्हाला अनेक कॅटेगरी मिळतील. ज्यामध्ये वेदर, गेम, स्पोर्ट्स, फन, ट्रांन्स्लेशनसारखे अनेक पर्याय आहेत.

फोटोज, इमोजी आणि स्टिकर्स असून तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल तर अॅलो अॅप मध्ये इन्कॉग्निटो मोड देखील देण्यात आला आहे. दरम्यान, हे अॅप डाऊनलोड करताना एकदम स्लो आहे. त्यामुळे त्वरीत डाऊनलोड होत नसल्याचे दिसून आले.

Leave a Comment