‘फोर्ब्स’; मुकेश अंबानी यांच्याकडे भारतात सर्वाधिक संपती

mukesh-ambani
नवी दिल्ली – देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांकाचे स्थान मिळवले असून, यंदाच्या यादीचे वैशिष्ट म्हणजे या यादीमध्ये पतंजली आयुर्वेदाचे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनीही स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वीच आचार्य बाळकृष्ण हे त्यांच्या नावावरील संपत्तीमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आले होते. आता त्यांचाही फोर्ब्सच्या यादीमध्येही समावेश झाल्यामुळे त्यांच्याकडील संपत्तीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.

यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे भारतातील सर्वाधिक २२.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे दिलीप संघवी यांचा क्रमांक लागला आहे. संघवी यांच्याकडे १६.९ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. भारतातील यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हिंदूजा बंधुंचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण १५.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या पतंजलीने अलीकडच्या काळात विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांमुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का बसला आहे. पतंजलीमध्ये रामदेव यांच्यासोबत सहसंस्थापक असलेले आचार्य बाळकृष्ण यांच्या नावावर २.५ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. यादीमध्ये आचार्य बाळकृष्ण यांचा तिसरा क्रमांक आहे. त्यांच्याकडील एकूण उत्पन्नापैकी सर्वाधिक ९७ टक्के ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतूनच मिळाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

Leave a Comment