पॅरिसमध्ये घडणार भारतीय संस्कृतीचे दर्शन

namste-france
पॅरिस – भारतीय परंपरा आणि सांस्कृतिकतेचे दर्शन फ्रांसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नमस्ते फ्रांस’ महोत्सवात घडणार असून भारताचे दुतावास मोहन कुमार ला विल्लेट्टे येथील या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या साहाय्याने फ्रांसमधील भारतीय दुतावासाने अडीच महिन्याच्या प्रदिर्घ महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात भारतीय पारंपरिक कला, संगीत, नृत्य, साहित्य दर्शन, चित्रपट आणि फॅशनचे दर्शन घडणार आहे. ‘नमस्ते फ्रांस’ असे या महोत्सवाचे नाव असून, महोत्सवाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून समारोप ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतीय संस्कृती आणि फ्रांस संस्कृतीचा दोन्ही देशातील नागरिकांना अभिमान आहे. उभय देशात सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी ‘नमस्ते फ्रांस’ ही एक संधी असून, मैत्रीचे संबंध वाढविण्यासाठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया मोहन कुमार यांनी दिली.

Leave a Comment