नेस्लेतर्फे मॅगी नष्ट करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

maggy
नेस्ले कंपनीने त्यांची मुदत संपून गेलेली ५५० टन मॅगी पाकिटे नष्ट करण्यासाठी बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून त्याचा निर्णय आज दिला जाणार आहे. मॅगी नष्ट करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाकडून परवानगी घेणे आवश्यक होते असे नेस्लेच्या वरीष्ठ अधिकार्यां नी सांगितले.

गतवर्षी शिसे धातूचे प्रमाण मान्यतेपेक्षा अधिक असल्याच्या कारणावरून मॅगीवर बंदी घातली गेली होती. ५ जून २०१५ पासून ही बंदी आल्यानंतर नेस्लेने देशभरातील सर्व वितरक, दुकानदारांकडून मॅगी परत मागवून ती नष्ट केली होती. या मोहिमेत ३८ हजार टन मॅगी परत मागविली गेली होती पण त्यातील ५५० टन मॅगी कंपनीच्या गोदामात शिल्लक राहिली होती. बंदी हटविली गेल्यानंतर मॅगी पुन्हा बाजारात दाखल झाली मात्र या मॅगीचे शेल्फ लाईफ उलटून गेलेले असल्याने ती बाजारात आणली गेली नाही असे हे अधिकारी म्हणाले.

ही शिल्लक मॅगी नष्ट करण्यासाठी सिमेंट प्लांटची निवड कंपनी करणार आहे. या पूर्वी नष्ट केलेली मॅगी सिमेंट प्लांटमध्ये जाळून टाकली गेली होती.

Leave a Comment