गुगलचे पिक्सल स्मार्टफोन ४ आक्टोबरला येणार

pixel
गुगलने त्यांच्या एका इव्हेंटची आमंत्रणे मिडीयाकडे पाठविली असून हा कार्यक्रम ४ आक्टोबरला होत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार या कार्यक्रमात गुगल त्यांचे नवे अँड्राईड स्मार्टफोन पिक्सल या नावाने बाजारात उतरवेल. अॅड्राईड पोलिस वेबसाईटवर या फोन्सचे फोटो दिले गेले असून हे फोन पिक्सल व पिक्सल एक्स एल या नावाने येतील असे समजते. या दोन्ही फोनसाठी अँड्राईड एनएमआरआय १( नगेट मॅन्यूफॅक्चरिंग रिलीज १) ही ओएस दिली जाईल.

पिक्सलसाठी ५ इंचाचा तर पिक्सल एक्सएलसाठी ५.५ इंचाचा स्क्रीन दिला जाईल. दोन्ही फोनसाठी ४ जीबी रॅम व अॅल्युनिमिनय बॉडी असेल तसेच बॅकपॅनल ग्लासचे असेल. बॅक पॅनलवर कॅमेर्‍यासह एलईडी फ्लॅश, फिंगरप्रिट सेन्सर दिला जाईल असेही समजते. तैवानची कंपनी एचटीसी च्या सहकार्याने हे फोन बनविले गेले आहेत. त्यांच्या किमती ४३५०० पासून सुरू होतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment