२६ लाखात मिळणार चीनची बनावट रॉल्स रॉयल

rolls-roycs
नवी दिल्ली : कार निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणात चीनच्या कार्स या प्रसिद्ध आहेत. नव्या कार्सपेक्षा कमी किमतीत या कार्स आहेत. कारण या सर्व कार्स ओरिजनल कार्सच्या डुप्लिकेट कार्स असल्यामुळे मूळ किंमत २ कोटी असलेल्या रॉल्स रॉयल या कारची किंमत २६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

‘मेड इन चायना’ अशी ही नवी कारही असल्यामुळे ही कार जेई आणि ओरिजनल रॉल्स रॉयस फँटमला ओळखणे ग्राहकांना अवघड होत आहे. त्या कारचे अशा विशेष प्रकारे असे डिझाइन केले आहे. चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या या ‘लेडी’ चा लोगोही कॉपी करण्यात आल्यामुळे या कारची किंमत २ कोटी रुपये असून देखील याची किंमत २६ लाख रुपये ठेवण्यासाठी आली आहे.