लवकरच बाजारपेठेत दाखल होणार गुगलचा जबरदस्त स्मार्टफोन

google1
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचा आता नवा स्मार्टफोन बाजारात येणार असून गुगलचा हा नवा पिक्सल स्मार्टफोन येत्या ४ ऑक्टोबरला लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये गुगलने जबरदस्त फिचर्स दिले असून या स्मार्टफोनला अधिक आकर्षक करण्यात आल्याची चर्चा आहे.

या स्मार्टफोनसाठी कंपनीने एक खास वेबसाईट तयार केली आहे. त्यावर युजर्स ते लोकेशननुसार हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार हे सांगत आहेत. भारतात ही तारीख ५ ऑक्टोबर सांगितली जात आहे. हा नवा नेक्सस डिवाइस एचटीसी बनवत आहे. आणि त्याचे नाव पिक्सल आणि पिक्सल एक्सएल असे आहे. तर त्यांचे कोड नावे सेलफिश आणि मार्लिन आहे.

रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन ५ आणि ५.५ इंच स्क्रिनमध्ये उपलब्ध होणार आहे. ५ इंचाच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080p इतका असेल तर ५.५ इंचाच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले व्कॅड एचडी स्क्रिनसोबत असेल. असे सांगितले जात आहे की, गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये २७७०mAh आणि ३४५०mAh ची बॅटरी मिळू शकते. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ३२ ते २५६ जीबीच्या इंटरनल स्टोरेजसोबत मिळण्याची शक्यता आहे. तर या स्मार्टफोनमध्ये १२ आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आल्याचीही माहिती आहे. या स्मार्टफोनची किंमत ६४९ डॉलर इतकी असण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतात हा स्मार्टफोन ४४ हजार रूपयांच्या आसपास मिळेल. अजूनही लॉन्चिंगच्या तारखेबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही, पण माध्यमात चर्चा हीच आहे की, हे दोन नवे स्मार्टफोन ४ ऑक्टोबरला लॉन्च करण्यात येतील.

Leave a Comment