मोदींसाठी अच्छे दिन,पाकचा खातमा नाही- बेजान दारूवालांची भविष्यवाणी

bejan
प्रख्यात ज्योतिषी व गणेशभक्त बेजान दारूवाला यांनी त्यांच्या ८६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भविष्य वर्तविले आहे. त्यानुसार भारत पाकिस्तानमधील कटुता कितीही वाढली व युध्दाची संभावना केली जात असली तरी पाकिस्तानला नकाशावरून मिटविण्याची भारतीय नागरिकांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही. पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहीलच मात्र ते कशा परिस्थितीत असेल हे पाहणे उचित ठरेल. त्याचबरोबर २०१८ सालात भारत जगातील सुपरपॉवर बनेल व मोदींसाठी हे वर्ष सर्वात उत्तम असेल. मोदी या वर्षात जगभरात नावाजले जातील व न भूतो न भविष्यति अशी प्रसिद्धी त्यांना लाभेल.

बेजान दारूवाला हे जगभरात उत्तम ज्योतिषी म्हणून ओळखले जातात व त्यांच्या प्रशंसकात पंतप्रधान मोदींसह देशविदेशातील अनेक व्यक्ती आहेत. त्यांची अनेक भविष्य तंतोतंत खरी ठरली आहेत. २०१२ मध्ये मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांचे भविष्य वर्तविले होते व त्यात मोदी तुम्ही सर्व रेकॉर्ड तोडणार, मोठी झेप घेणार असे भविष्य सांगितले होते. त्यानुसार लोकसभेत भाजप २८४ जागांवर विजयी होऊन भाजपचे सरकार सत्तेवर आले अशी आठवणही सांगितली जात आहे.