नोकरीसोबतच मिळत आहे जमीन मोफत

farmers
कॅनडामधील केप ब्रेटनमधील सुंदर आयलँडवर असलेल्या व्हाईकोकोमाघ या गावामधील नागरिकांना नोकरी करण्यासोबतच २ एकर जमीन फुकट देण्यात येत आहे. खुपच सुंदर असे हे आयलँड असून ‘The Farmers Daughter’ नावाच्या मार्केटने आपल्या फार्ममध्ये काम करण्यास इच्छुक कर्मचा-यांसाठी ही खास ऑफर काढली आहे. यासंदर्भातील वृत्त independent.co.uk मध्ये प्रसारित करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना या फार्मच्या मालकांनी सांगितले की, त्यांच्याकडे जमीन आणि जॉब या दोन्ही गोष्टी आहेत मात्र, त्या ठिकाणी काम करण्यासाठी लोकांची कमतरता असल्यामुळे ही खास ऑफर काढली आहे. तसेच ही ऑफर फक्त कॅनाडामध्ये राहणा-या नागरिकांसाठीच आहे.

Leave a Comment