मुंबई : ‘गुगल’चे प्रतिनिधी विनय गोयल यांची अमेरिका दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असून मुंबईला वायफाय सिटी बनविण्यासाठी गुगलने पाठबळ देण्याची तयारी या झालेल्या भेटीत दर्शविली आहे.
गुगल बनविणार मुंबईला वायफाय सिटी
मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रात त्यांचा सहयोग घेण्याबाबतही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ‘एआयआरबीएनबी’ चे प्रतिनिधी ख्रिस लेहान आणि माइक ऑर्जिल यांनी राज्य पर्यटन विकास महामंडळाशी सामंजस्य करार करण्यासंबंधीच्या प्रस्तावाचा कंपनीकडून विचार करण्यात येत असल्याचे सांगितले.