इंटेक्सचा ऍक्वा एचडी लाँच

intex
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा ५.५ इंचाचा ऍक्वा एचडीचा स्मार्टफोन भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी इंटेक्सने लाँच केला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे. ५,६३७ रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. हा स्मार्टफोन शॅम्पेन आणि ब्लू कलरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले, १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोरचा प्रोसेसर, ६.० मार्शमेलो अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम, १ जीबी रॅम देण्यात आले आहेत. त्याचबरोबर याचा रिअर कॅमेरा ५ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. यात ८ जीबीची इंटरनल मेमरी आणि ३२ जीबीपर्यंत एक्सपांडेबल आहे. यात वाय-फाय, ब्लूटूथ, ३जी आणि जीपीएस अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आले आहे.

Leave a Comment