लावाचा एक्स २८ करणार सोप्पे भाषांतर

lava
नवी दिल्ली- आपला एक्स २८ हा स्मार्टफोन भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी लावाने लाँच केला असून अॅंड्रॉइड ६.० मार्शमेलो ऑपरेटिंग असलेल्या या फोनचा प्रोसेसर १ जीबी रॅमचा आहे. इंटरनल मेमरी ८ जीबी इतकी आहे. ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, एलईडी फ्लॅश, २,६०० एमएएच बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. स्लो मोशन व्हिडिओ किंवा टाइम लॅप्स व्हिडिओ चित्रीकरण देखील या फोनने करता येते. या फोनमध्ये १२ भारतीय भाषांमधून संदेश पाठवता येणे, टाइप करणे आणि भाषांतर करणे हे फीचर्सदेखील आहेत. इंग्रजीतून भारतीय भाषांमध्ये भारतीय भाषांमधून इंग्रजीत भाषांतर करणे सोपे होणार आहे.

Leave a Comment