कर्मचारी कपात करणार ट्विटर इंडिया

twitter-india
नवी दिल्ली- भारतामध्ये कर्मचारी कपात करण्याचा निर्णय मायक्रोब्लॉगिंग सोशल मिडिया वेबसाइट ट्विटरने घेतला असून पण नेमके किती कर्मचाऱ्यांनी ते काढणार आहेत याची माहिती अद्याप कंपनीने जाहीर केली नाही.

मागील वर्षी भारतीय कंपनी झिप डायलला आपल्यात सामावून घेतल्यानंतर ट्विटरला भारतात पाय रोवणे सोपे झाले होते. झिप डायलचे कर्मचारी देखील ट्विटर इंडियामध्ये काम करीत होते. सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत ट्विटरने म्हटले आहे की आम्ही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभारी असून त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. ट्विटर पेक्षा फेसबुकची लोकप्रियता अधिक असल्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे कंपनीला दिवसेंदिवस अवघड होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment