एकच रिचार्जमध्ये वोडाफोन देणार भरपूर काही

vodafone
मुंबई – वोडाफोन ग्राहकांना आता रिचार्ज करण्यापासून सुटका मिळणार आहे. एक नवा प्लान वोडाफोन कंपनीने लाँच केला आहे. यामुळे अवघ्या ११७ रुपयांत ग्राहकांना अनेक गोष्टी मिळणार आहेत. या प्लानमुळे ग्राहकांची इंटरनेट, रोमिंग, एसएमएस आणि व्हॉईस कॉलसाठी वेगळे रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती होणार आहे. या रिचार्ज अंतर्गत कंपनी एकाच किमतीत ग्राहकांना निश्चित संख्येत पॉईंट देणार आहे. या ११७ च्या माध्यमातूनच व्हॉईस कॉल, डेटा यूज, एसएमएस, रोमिंग आदींचा बॅलेन्स कट होईल. या रिचार्जची मुदत २८ दिवसांची असणार असून, यानंतर अतिरिक्त किंमत देऊन अॅडिशनल पॉईट घ्यावे लागतील.

११७ रुपयांचे एक रिचार्ज करुन ३२५ पॉईंटस (फ्लॅक्स) यासाठी वोडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना घ्यावे लागतील. यातून १ एमबी इंटरनेटच्या वापरावेळी ग्राहकाच्या खात्यातून काही पॉईट कट होतील. २जी, ३जी आणि ४जी साठी एकच दर असणार आहे. एका एसएमएस आणि एका मिनिटाच्या रोमिंगवरही अशाच प्रकारे पॉईट ग्राहकाच्या खात्यातून कट होतील. एका मिनिटाच्या आऊटगोइंग कॉल आणि एसटीडी कॉलसाठी ग्राहकाला २ फ्लॅक्स पॉइंट द्यावे लागतील. रोमिंगमध्ये एका मिनिटाच्या आऊटगोईंग कॉलसाठीही समान दर असतील.

Leave a Comment