अब्जाधीश कुत्रा, मांजरी आणि कोंबडी

manjar
फोर्ब्स या मासिकातून नेहमीच अब्जाधीश श्रीमंतांच्या नावाची चर्चा केली जाते त्यांच्या याद्या प्रसिद्ध होतात. पैसा कुणाला, कधी व कसा मिळेल याचा अंदाज मात्र बांधता येणे अवघड असते. एखाद्या व्यक्तीला असा पैसा मिळाला की त्याची चर्चा होते. पण श्रीमंत असणे ही मानवजातीची मक्तेदारी नाही. जगात असे अनेक प्राणीही आहेत जे अब्जाधीश आहेत. अशाच कांही प्राण्याची ही माहिती

ब्लँकी मांजरी- जगातील सर्वात श्रीमंत मांजरी अशी ब्लँकीची ख्याती आहे. इतकेच नव्हे तर गिनीज बुकमध्येही सर्वाधिक श्रीमंत मांजरी म्हणून ब्लँकीचे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. अर्थात ही श्रीमंती तिला तिच्या मालकीणीमुळे प्राप्त झाली आहे. बेना रिया असे तिच्या मालकीणीचे नांव. या बेनाबाईंकडे रगड संपत्ती होती व वारस कुणीच नव्हते. त्यामुळे बेना नंतर तिची संपत्ती आपल्याला मिळेल या आशेवर तिचे नातेवाईक होते. पण बेनाने या नातेवाईकांच्या तोंडाला पाने पुसली व मृत्यूपत्रात सारी संपत्ती तिची लाडकी मनी ब्लँकीच्या नांवे केली.

murgi
गीगू कोंबडी- सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीची कथा बहुतेक सर्वांना माहिती असते. गीगू ही कोंबडी सोन्याची अंडी देत नाही मात्र सोन्याच्या बेडवर आराम करते. तिच्या तैनातीसाठी नोकरचाकरांचा ताफा आहे आणि महाराणी गिगू रोज शाही मेजवान्या झोडते. तिच्यासाठी खास शेफ आहेत तसेच तिचे स्वतःचे सुरक्षारक्षकही आहेत. गीगू १ कोटी डॉलर्स म्हणजे ६६ कोटी ९५ लाख रूपयांची मालकीण आहे. गाडी, बंगला, नोकर, शेफ सर्व कांही असलेल्या गिगूला ही संपत्ती तिच्या मालकांकडून वारसाहक्काने मिळाली आहे. गिगूचे दोन मालक होते व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अफाट संपत्तीची वारसदार म्हणून गिगूचे नांव होते.

kutta
गंथर कुत्रा – गंथर नावाचा हा कुत्रा कुबेराचा खजिना बाळगून आहे हे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. १४.५ कोटी डॉलर्स म्हणजे ९५० कोटी रूपयांची त्याची संपत्ती आहे व ही त्याला वारसाहक्काने मिळाली आहे. म्हणजे गंथरचा बाप असलेल्या कुत्र्याला ही संपत्ती त्याच्या मालकाकडून मिळाली व या कुत्र्याच्या मृत्यूनंतर ती गंथरकडे आली. या मालकाचे नांव होते कार्लोत्ता लिबेनस्टाईन. त्याने मृत्यूपत्रात सर्व संपत्ती गंथरच्या बापाच्या नावाने करून दिली होती.

Leave a Comment