वृद्धाच्या पोटात एक किलोचा मूतखडा

doctor
वसई : एका रुग्णाच्या पोटातून चक्क एक किलो वजनाचा मूतखडा वसईत डॉ. देवेंद्र पाटील यांनी ऑपरेशन करून बाहेर काढला असून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या घटनेची नोंद व्हावी, म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.

वसईच्या नायगावमध्ये राहणारे एडवर्ड वॉर्नर हे ७२ वर्षाचे गृहस्थ लघवीच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. एक्सरेमध्ये हा मूतखडा आढळून आला. अखेर सर्जरी केल्यावर हा एवढा मोठा मूतखडा पाहून डॉक्टरही हैराण झाले. याचं वजन एक हजार १०० ग्रॅम म्हणजे १ किलोहून अधिक आहे. या मूतखड्याचा आकार १३.५ सेंटीमीटर बाय ९ सेंटीमीटर आहे. डॉक्टरांसाठी हे ऑपरेशन आव्हानात्मक होते. कारण रुग्णाला हृदयविकाराचाही त्रास आहे. तसेच त्या रुग्णाचे मूत्राशय कृत्रिम होते. तरीही डॉक्टरांनी हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. तर एवढ्या मोठ्या वजनाचा मूतखडा भारतात तरी अजून सापडला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही