येताहेत कॅश डिपॉझिट मशीन्स

paisa
पैसे भरण्यासाठी आता ग्राहकांना आपल्या बँकेत जाण्याची गरज उरणार नाही कारण नॅशनल पेमेंट कार्पोरेशनने इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट मशीन्स बसविण्याची सुरवात केली असून तीन बँकात हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील सर्व बँका यात जोडल्या जाणार आहेत. सध्या आंध्र बँक, पंजाब व महाराष्ट्र को. ऑप. बँक व युनियन बँक ऑफ इंडिया या तीन बँकात त्याची सुरवात झाली आहे.

सध्याही अनेक बँकांची कॅश डिपॉझिट मशीन्स आहेत. मात्र त्यात त्याच बँकेचे खाते असेल तरच ग्राहक पैसे भरू शकतो. नव्या योजनेनुसार कोणत्याही बँकेत खाते अ्सले तरी या मशीनमधून पैसे भरता येणे शक्य आहे व दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणावरून हे पैसे आपापल्या बँक अकौंटमध्ये ग्राहक भरू शकणार आहेत. ही मशीन्स एटीएम प्रमाणेच आहेत. ही योजना यशस्वी झाली तर एटीएम प्रमाणेच जागोजागी अशी मशीन्स बसविली जाणार आहेत.

Leave a Comment