नव्या रंगात टीव्हीएसची स्टार सिटी प्लस उपलब्ध

tvs
नवी दिल्ली – टीव्हीएस स्टार सिटी प्लस, स्पोर्ट आणि स्लॅक सिल्व्हर या दुचाकी टीव्हीएस मोटार कंपनीने नव्या रंगात उपलब्ध केल्या आहेत. कंपनीने ही पावले देशात लवकरच येणा-या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उचलली आहेत. टीव्हीएस स्टार सिटी प्लस हा आता एकूण ११ रंगात उपलब्ध होईल. याचबरोबर टीव्हीएस स्पोर्ट एकूण ९ रंगात उपलब्ध होईल. कंपनीने आपल्या या दोन दुचाकी ग्राहकांना आवडेल अशा प्रकारे नवीन रंगात आणण्याचा निर्णय घेतला. हा रंग सणांचे प्रतीक बनेल. याचबरोबर दुचाकीचा रंग आकर्षक वाटण्यावर भर देण्यात आला आहे. दुचाकीच्या रंगामुळे चालकाच्या व्यक्तिमत्त्वात भर पडते असे आपल्याला वाटते असे कंपनीच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष अरुण सिद्धार्थ यांनी सांगितले. गाडीमध्ये अन्य कोणत्याही प्रकारची सुधारणा कंपनीने केलेली नाही. १०९.७ सीसी इंजिन आणि टय़ुबलेस टायर तसेच डिजिटल फ्युएल ग्यॉज असणा-या टीव्हीएस स्टार सिटी प्लसची एक्स शोरुम दिल्लीतील किंमत ४४ हजार ३०० रुपये आहे.

Leave a Comment