नवी दिल्ली – दूरसंचार क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या एअरटेलने दूरसंचार क्षेत्रात नव्यानेच दाखल झालेल्या रिलायन्स जिओबरोबर स्पर्धा करण्यास तयार असून गेली अनेक वर्षे ग्राहकांना उत्तम सेवा आणि स्पेक्ट्रमवर मोठय़ा प्रमाणात मालकी असल्याने स्पर्धा करताना कोणतीही समस्या येणार नाही. मात्र आपल्यासाठी जिओ हा कडवा स्पर्धेक आहे. मात्र प्रथम स्थानापासून एअरटेलला कोणीही हटवू शकत नाही, असे भारती एअरटेलचे प्रमुख सुनिल मित्तल यांनी सांगितले. बाजारात रिलायन्स जिओ दाखल झाल्यानंतर प्रथम सार्वजनिक मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
जिओला टक्कर देण्यास एअरटेल सज्ज
जिओबरोबर मोबाईल नंबर पोर्टबिलिटी, इंटरकनेक्शन यासारख्या समस्या येत असल्याने पुढील काही दिवसांत त्या सोडविल्या जातील. रिलायन्स जिओ भारतात दाखल होण्यापूर्वी एटी ऍन्ड टी, हचसन, इटीसालट, टेलेनॉर या सारख्या कंपन्यांबरोबर एअरटेलने स्पर्धा केली आहे. सध्या आपण आयडिया आणि व्होडाफोन यासारख्या कंपन्यांबरोबर प्रतिदिनी स्पर्धा करत आहोत. मात्र रिलायन्स जिओबरोबरची स्पर्धा सर्वात कडवी होणार आहे. या सर्व कंपन्यांबरोबर स्पर्धा करत अद्याप भारती एअरटेल प्रथम क्रमांकावर आहे, असे मित्तल यांनी सांगितले.
यापूर्वी भारतीय बाजारात एअरटेलनंतर अनेक कंपन्या आल्या. मात्र या कंपन्यांबरोबर आपल्याला कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागले नाही. मात्र जिओबरोबर पहिल्यांदा इंटरकनेक्शनच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल. एअरटेलकडून जिओकडे पोर्ट होणा-या ग्राहकांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्यात येईल. जिओने एअरटेलला प्रथमच पॅन इंडिया क्षेत्रात आव्हान दिले आहे. मात्र भारतात दाखल होण्यास साधारण ६ ते ७ वर्षे लागली याकडे आपण आश्चर्याने पाहतो असे त्यांनी स्पष्ट केले.