केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन होणार रेल्वे अर्थसंकल्प !

budget
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन करण्याच्या हालचाली पूर्ण झाल्या असून, यावर आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

या निर्णयाला रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी हिरंवा कंदिल याअगोदरच दाखविला होता. त्यामुळे या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. याबैठकीत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मितल हेही उपस्थित राहणार आहेत. या निर्णयाला मंत्रीमंडळात मंजुरी मिळाली तर ९२ वर्षापूर्वीच परंपरा मोडीत निघणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी संयुस्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यात अनेक त्रुटी लक्षात आणून दिल्या.

Leave a Comment