वॉल्वोची १.२५ करोडची हाईब्रिड एसयुवी भारतात लाँच

volvo
मुंबई: देशात पहिली प्लग-इन हायब्रिड एसयुव्ही कार उत्पादन क्षेत्रातील नावीन्यपूर्णतेला प्रचंड वेग प्राप्त करवून देत वॉल्वो ऑटो इंडियाने बाजारपेठेत दाखल केली असून एक्ससी ९०, टी ८ एक्सेलन्स हे नवीन मॉडेल म्हणजे वॉल्वोच्या गेल्या ८९ वर्षांच्या इतिहासातील पहिली सर्वाधिक लक्झरियस वॉल्वो आहे. संपूर्ण जगभरात नावाजल्या गेलेल्या व विविध पारितोषिकांनी सन्मानित केल्या गेलेल्या एसयुव्ही एक्ससी ९० वर आधारलेली एक्ससी ९० टी ८ एक्सेलन्स वॉल्वो ऑटो इंडियाची स्वीडिश लक्झरी कार ब्रॅन्ड ही ओळख अधिक गडद करेल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, एक्ससी९० टी८च्या पेट्रोल इंजिनमध्ये शक्ती व उच्च इंधन बचत यावर अधिक भर देण्यात आला आङे. या एसयुव्हीमध्ये जागतिक दर्जाचे कमी कार्बनोत्सर्जन हे खास वैशिष्टयदेखील आहे. एक्ससी९० टी८ ही जगातील सर्वाधिक कमी कार्बनोत्सर्जन (प्रति किमी ४९ ग्रॅम) असणारी सात आसनी एसयुव्ही असून, यात ४० किमीपर्यंत इलेक्ट्रीक रेन्ज आहे.

वॉल्वो ऑटो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर टॉम वॉन बॉन्सडॉर्फ यांनी सांगितले की, एक्ससी९० टी८ एक्सेलन्सने पर्यावरणस्नेह व कार्बनोत्सर्जनाच्या बाबतीत नवीन मापदंड निर्माण केले आहेत. ही वैशिष्टये एका फर्स्ट-क्लास स्वीडीश एसयुव्हीमध्ये मिळत आहेत. हिच त्याची खासियत आहे. ही या विभागातीलच नव्हे तर भारतातील पहिली प्लग-इन हायब्रिड एसयुव्ही आहे. चोखंदळ ग्राहक या एसयुव्हीला नक्कीच पसंती देतील, असा विश्वासही बॉन्सडॉर्फ यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

Leave a Comment