‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आईस्क्रिमच्या कांड्यापासून बनविलेल्या गणपतीची नोंद

ganpati
उडपी – कर्नाटकातील एका तरुणाने आईस्क्रिमच्या कांड्यापासून भव्य गणपतीची मूर्ती तयार केली असून ईकोफ्रेंडली गणपतीची संकल्पना पुढे येत असताना महेश नामक या तरुणाचे हे प्रयत्न आदर्श ठरणार आहेत. महेश हा मारणे या गावचा रहिवाशी आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने महेशच्या या कलाकृतीची दखल घेतली आहे.
ganpati1
त्याला प्रत्येक वर्षी गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती करण्याचा छंद आहे. महेशने मागील वर्षी काडीपेटीच्या कांड्याने २७ बाय १७ इंचाची मूर्ती तयार केली होती. त्यानंतर त्यानेही याही वर्षी गणपतीची मूर्ती तयार केली. त्यासाठी त्याने ३ हजार ५०० आईसक्रीम कांड्या आणि ७५० काडीपेटीच्या कांड्या वापरल्या आहेत. या कालाकृतीमुळे महेशला यावर्षी विक्रमांचे प्रमाणपत्र मिळाले.

Leave a Comment