स्नॅपडीलच्या आनंद चंद्रशेखरन यांची फेसबुकमध्ये एन्ट्री

anand-chandrasekarn
नवी दिल्ली : स्नॅपडीलचे माजी चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आनंद चंद्रशेखरन यांची फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्या मेसेंजर अॅपसाठी स्ट्रॅटेजिक पदावर नियुक्ती केली आहे. फेसबुकच्या साम्राज्यात आनंद यांच्या रुपाने भारतीय माणसाची दमदार एन्ट्री झाली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या नियुक्तीबाबत आनंद चंद्रशेखरन यांनी माहिती दिली. आनंद यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी फेसबुक मेसेंजर प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी फेसबुकशी जोडला गेलो आहे आणि फेसबुकसोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे. २०११-१४पर्यंत आनंद चंद्रशेखर ‘याहू’मध्ये वरिष्ठ संचालक होते. त्यानंतर त्यांनी एअरटेल आणि स्नॅपडीलमध्ये वरिष्ठ पदांवरही काम केले आहे.

Leave a Comment