व्हॉट्सअॅपने करा मित्रांना टॅग

whatsapp
मुंबई : आता आणखी एका फीचरचा आनंद व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या यूझर्सना घेता येणार असून जसे @ टाईप केल्यावर फेसबूक आणि ट्विटरवर नावे दिसतात तसेच आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही टॅग करु शकणार आहात.

हे फीचर तुम्हाला ग्रुप चॅटमध्ये देखील वापरता येणार आहे. कितीही जणांना तुम्ही टॅग करु शकणार आहात. नंबर सेव्ह नसल्यास तुम्हाला तो नंबर टॅग करावा लागणार आहे. फेसबूक, ट्विटरप्रमाणे टॅग केल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव हायपरलिंकमध्ये दिसेल. अँड्रॉईड आणि iOS यूझर्सना ही सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आली आहे, व्हॉट्सअॅप वेबसाठी हे फीचर वापरता येणार नाही. तुम्ही ज्या नावाने नंबर सेव्ह केला आहे त्याच नावाने ते इतरांनाही दिसेल.

Leave a Comment