भारताचे परकीय कर्ज ४८५.६ अब्ज डॉलर्सवर

foreign
भारताचे परकीय कर्ज मार्च २०१६ अखेर १०.६ अब्ज डॉलर्स म्हणजे २.२ टक्यांनी वाढून ४८५.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले असल्याचे अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कर्जात झालेली ही वाढ प्रामुख्याने अनिवासी भारतीयांकडून होणारी जमा व दीर्घमुदतीची कर्जे यामुळे झाली आहे. एक वर्षाच्या तुलनेत दीर्घमुदतीच्या कर्जातील वाढ ३.३ टक्के आहे. गतवर्षी ४०२.६ अब्ज डॉलर्सची दीर्घमुदतीची कर्जे होती.

परकीय कर्जातील दीर्घ मुदतीच्या कर्जाचा हिस्सा एकूण कर्जाच्या ८२.८ टक्के आहे त्याचवेळी अल्पमुदतीची कर्जे २.५ टक्कयांनी घटून ८३.४ अब्ज डॉलर्सवर आली आहेत. या कर्जा चे प्रमाण घटण्यामागे प्रामुख्याने व्यापारसंबंधीच्या कर्जात झालेली घट हे मुख्य कारण सांगितले जात आहे.

Leave a Comment