पुण्यात उपलब्ध झाली बहुप्रतिक्षित डुकाटी एक्सडियावेल

ducati
पुणे : पुण्यात बहुप्रतिक्षित एक्सडियावेल मोटरसायकल डुकाटीने सादर केली असून दोन संकल्पनांचे एकत्रिकरण डुकाटी एक्सडियावेल या मोटरसायकलमध्ये करण्यात आले आहे. एक म्हणजे आरामदायी सवारी, लांबचा प्रवास व पाय पुढे ठेवण्यासाठीचे एर्गोनॉमिक्स असलेली क्रुझरची संकल्पना. तर दुसरे म्हणजे इटालियन स्टाईल, उत्कृष्ट तंत्रज्ञान व अतुलनीय परफॉर्मन्स असलेली डुकाटी वर्ल्डची संकल्पना.

याबाबत अधिक माहिती देताना डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रवी अवालूर म्हणाले की, भारतातील आरामदायी मोटरसायकल श्रेणीमध्ये क्रुझर्स सर्वांत मोठे सेगमेंट आहे. क्रुझर संकल्पनेत क्रांती घडविणार्‍या उत्पादनासह आम्हाला या सेगमेंटमध्ये उतरायचे होते आणि एक्सडियावेल तिच्या फ्युचरिस्टिक स्टाईलिंग, अद्यावत तंत्रज्ञान व अत्यंत काटेकोरपणे तयार केलेल्या इंजिनमुळे हे शक्य झाले आहे.ग्राहकांनी केलेल्या प्रि बुकींग्समुळे आमच्या वितरकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आम्हाला विश्‍वास वाटतो की एक्सडियावेल ही देशातील क्रुझर प्रेमींची पहिली पसंती ठरेल. बवेरिया मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक विशाल अगरवाल म्हणाले की,या क्रांतिकारी उत्पादनासह आम्ही क्रुझर श्रेणीमध्ये प्रवेश केल्याने आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे.आम्हाला सध्याच्या क्रुझर रायडर्सकडून प्रतिसाद मिळत आहेच.परंतु त्याबरोबरच मोटरसायकलस्वारांना डुकाटी परफॉर्मन्स व लेड बॅक क्रुझर सवारी अनुभवायची आहे. याबरोबरच भारतात उच्च कार्यक्षमतेच्या टेक्नो क्रुझरचा प्रवेश झाला आहे.