देशातील प्रत्येक मुलीच्या नावे ११ हजाराची मुदत ठेव!

fixed-deposite
नवी दिल्ली : आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे ११ हजार रुपयांची मुदत ठेव असणार आहे. ही घोषणा देशातील हेल्थकेअर नेटवर्क ‘ऑक्सी’ने केली आहे. कंपनीने हा निर्णय रिओ ऑलिम्पिकमध्ये देशातील महिला खेळाडूंनी भारताची वाढवलेली शान आणि मानानं प्रेरित होऊन घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंपनीतर्फे देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे बचत खाते उघडण्यात येणार आहे. या अकाऊंटमध्ये प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ती हे पैसे काढू शकेल. ‘ऑक्सी’ची ही योजना पूर्णत: मोफत आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक पंकज गुप्ता यांनी दिली आहे. गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले नाव रजिस्टर करावे लागणार आहे. त्यानंतर ‘गर्ल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.

Leave a Comment