होंडाने आणली नवी X-Adv ऍडव्हेंचर क्रॉसओव्हर स्कुटर

honda
नवी दिल्ली : नुकतीच जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने खास आपल्या ग्राहकांसाठी नवी X-Adv ऍडव्हेंचर क्रॉसओव्हर स्कुटर लाँच केली असून या नव्या स्कुटरच्या माध्यमातून चालकांना एक सुखद असा अनुभव घेता येणार आहे.

कंपनीने या नव्या स्कुटरमध्ये लाँग स्विनगरम, युएसडी फोर्क्स, वाइड व्हिलस् आणि एबीएस सिस्टिम देण्यात आले आहे. याबरोबरच या स्कुटरमध्ये कंपनीने लाँग ट्रव्हल सस्पेन्शनही देण्यात आले आहे. खडतर रस्त्यांमध्ये वाहन चालवण्यासाठी चालकाला मदत करणार आहे.

दुस-या स्कुटर्ससारखे उंच आणि सर्वोत्कृष्ट असे या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवण्यात आले आहे. या नव्या स्कुटरमध्ये ७५० सीसीचे पॅरेल ट्विन इंजिन देण्यात असून, तो ५४ हॉर्स पॉवर आणि ६८एनएमचा टार्क जनरेट करु शकतो. तसेच या स्कुटरमध्ये डिसीटी ऑटोमेटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Leave a Comment