ढगांना कापत जाणारी रेल्वे

clouds
रेल्वे प्रवास हा कुणासाठीच नवीन राहिलेला नाही. रेल्वेतून जाताना मोठमोठे पूल, बोगदे हेही आता नवलाचे राहिलेले नाहीत. अगदी विमानप्रवासातही ढगांच्या पायघड्यांवरून जाणारे विमान अनेकांनी अनुभवले असेल मात्र खाली ढग आणि ढगांच्या पायघड्यावरून धावणारी रेल्वे हा स्वप्नातला प्रवास वाटू शकेल. अर्थात हा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्जेंटिनाचा रस्ता धरायला हवा.

समुद्रसपाटीपासून ४ हजार मीटरवरून जाणारा हा रेल्वे मार्ग अँडीज पर्वतरांगातून जातो व या प्रवासात एक जागा अशी येते की रेल्वेच्या चोहोबाजूंनी फक्त ढग आणि ढगच दिसतात. जणू ढगांना कापत रेल्वे चालली आहे असा भास येथे होतो. कांही वेळा तर या ढगांनी रेल्वे पूर्ण झाकलीही जाते. ट्रेन टू द क्लाऊड असे सार्थ नांव या रेल्वेला प्रवाशांनी दिले आहे.

अमेरिकन इंजिनिअर रिचर्ड फाँटेन यांनी १९२० साली हा मार्ग उभारण्यास प्रारंभ केला असे सांगितले जाते. अर्जेंटिनातील सिटी कुसाल्टापासून १६ तासांचा प्रवास ही रेल्वे करते. १६ तासात २१७ किमीचे अंतर तोडले जाते. उंच पहाडातून ३ हजार मीटरचा प्रवास यात केला जातो. या प्रवासात २९ पूल आणि २१ बोगदे लागतात.

Leave a Comment