व्हिडीओकॉनने त्याचा नवा स्मार्टफोन क्यूब थ्री पॅनिक बटण व फोर जी व्होल्टसह सादर केला असून तो कोणत्याही ऑफलाईन दुकानात ८४९० रूपयांना उपलब्ध आहे. पॅनिक बटण असणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे व यापुढचेही सारे फोन पॅनिक बटणसहच येतील असे व्हीडीओकॉनने जाहीर केले आहे.
पॅनिक बटणसह व्हिडीओकॉनचा क्यूब ३ स्मार्टफोन लाँच
या फोनला एसओएस बी सेफ मध्ये अॅलर्ट, वॉक वुइथ मी, रिच ऑन टाईम अशी फिचर्सही दिली गेली आहेत. या फोनसाठी ५ इंची कर्व्ह ग्लास ड्रॅगन ट्रेल प्रोटेक्शनसह दिली गेली आहे. ३ जीबी रॅम, ड्युअल सिम, अँड्राईड मार्शमेलो ६.०, १३ एमपीचा ड्युल एलईडी फ्लॅशसह रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा अशी अन्य फिचर्स आहेत.